मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक कालवश

मुंबई, १५ जून २०२० : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या धक्यातून चित्रपट सृष्टी बाहेर पडते ने पडते तोच आणखी एक धक्का चित्रपट सृष्टीला बसला आहे.मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी आल्पशा आजाराने निधन झाले.

दिग्दर्शक कांचन नायक हे एक उत्तम दिग्दर्शक तसेच परिक्षक देखील होते.जब्बार पटेल यांच्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण या चित्रपटात मुख्य साहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले होते

त्यांनी दिग्दर्शक म्हणून इंद्रधनुष्य, क्राईम डायरी, श्रावण सरी या मालिका तर वैभवलक्ष्मी, दणक्यावर दणका, माझी आई, घर दोघांच, विश्वनाथ एक शिंपी, कळत नकळत असे प्रसिद्ध चित्रपट प्रेक्षकवर्गला दिले. तर पुष्कर जोग यांनी पदार्पण केलेला राजू चित्रपट देखील कांचन नायक यांनी दिग्दर्शन केला होता. तसेच ते अनेक डाॅक्युमेंटरीसाठी सुद्धा प्रसिद होते. विश्वनाथ एक शिंपी व कळत नकळत या चित्रपटांच्या दिग्दर्शनांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा