कराची, दि. २२ जून २०२० : पाकिस्तानातील प्रसिद्ध शिया अभ्यासक आणि लेखक तालिब जोहरी यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. ‘डॉन न्यूज’ च्या सोमवारच्या वृत्तानुसार, २७ ऑगस्ट १९३९ रोजी पाटण्यात जन्मलेल्या तालिब जोहरी यांना तीन मुले आहेत. फाळणीच्या दोन वर्षानंतर १९४९ मध्ये ते वडिलांसोबत पाकिस्तानात गेले होते.
वडिलांकडून प्रारंभिक प्रशिक्षण घेतल्यानंतर ते पुढील अभ्यासांसाठी इराकला गेले, जिथे त्यांनी तत्कालीन प्रख्यात शिया विद्वानांच्या अधीन १० वर्षे धर्मशास्त्राचा अभ्यास केला. जौहरी गेल्या १५ दिवसांपासून आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते, रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा रियाझ जोहरी यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह अंचोली इमाम बारगाह येथे नेण्यात येत असल्याचे वृत्त ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ ने दिले आहे.
जौहरी हे त्यांच्या समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि ते विख्यात पंडित अयातुल्ला सय्यद अली अल-हुसैनी अल-सिस्तानी यांच्यासह बराच अभ्यास केला. ते कवी, इतिहासकार आणि तत्वज्ञानीही होते आणि त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जोहरीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी