कृषी सहाय्यक अधिकारी मधुकर पाबळे यांचा साध्या पध्दतीने निरोप समारंभ

कर्जत:३० मे २०२०: कर्जत तालुक्यातील कृषी खात्यात आपली सेवा अविरतपणे बजावणारे कृषी सहाय्यक अधिकारी मधुकर पाबळे यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम जलालपूर ग्रामपंचायत येथे करण्यात आला.

पाबळे हे राशिन कृषी मंडल विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून गेली आठ्ठावीस वर्ष काम पाहिले आहे.पाबळे हे त्या आधी श्रीगोंदा तालुका या ठिकाणी कार्यरत होते. नंतर त्यांची बदली कर्जत विभागात झाली.

निरोप देते वेळी मनोगत व्यक्त करताना भागवत धालवडे पाटील यांनी त्यांच्या कार्यला उजाळा देताना सांगितले कि, पुन्हा असा कृषी अधिकारी मिळणे शक्य नाही. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. त्या नंतर बापु कांबळे यांनी सांगितले की, कामांची पध्दत ही नम्र होती आणि कामात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला नाही. गावचे पोलिस पाटील आण्णा सांगळे यांनी मत व्यक्त करताना त्यांच्या उत्कृष्ट कार्यला सलाम केला. शेतकरी वर्गाचे चांगली सेवा केली.त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत धालवडे यांनी केले. मनोगत पोलिस पाटील सांगळे आणि ग्रामपंचायत सदस्य बापु कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सरपंच लालासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य मोतिराम कासारे, बापू खुंरगे सोसायटीचे संचालक सचिन बोराटे,संदिप भोसले, राजु बाराते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार बापु कांबळे यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा