मुंबई, १६ डिसेंबर २०२०: मनोरंजन क्षेत्रात प्रत्येक घरात ठसा निर्माण करणारी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी एक नवीन मालिका घेऊन आली आहे. ज्याचा प्रोमो सध्या जोरात चालु आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो वाहिनीवर दिसला आणि सोशल मीडियावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपण्याबाबतच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
कारण ही नवी मालिका रात्री ८ वाजता प्रसारित होणार असल्याचंही त्यात म्हटलं जातंय. ज्यामुळं मालिका संपण्याच्या चर्चेला उधाण आलं. पण, ती मालिका संपणार नसून “माझ्या नवऱ्याची बायको” प्रेक्षकांचं अजून ही मनोरंजन करणार आहे. पण, वेगळ्या वेळेत. झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सर्वांनाच आवडलेला “राणा दा” आणि “अंजली बाई” आता काही दिवसच प्रेक्षकांना दिसणार असून ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपणार असल्याचं समजतंय. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या वेळेत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ लागणार असल्याचं बोललं जातंय.
तसं “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेनं सुरवातीपासूनच प्रेक्षक वर्गावर छाप पाडला होता. रांगडा मर्द गडी म्हणून हार्दिक जोशी अर्थात राणा दा आणि आक्षया म्हणजेच अंजली बाई ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील आवडती जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी हा एक धक्काच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव