पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयतील मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाच्या वतीने ११ व १२ जानेवारी २०२० रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय चित्रपट लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात विविध देशातील २००० हून अधिक लघुपटांची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे, धुरळा चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विदव्ंस, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बाल कलाकार यशराज कानडे आणि आगामी चित्रपटाचे अन्य कलाकार, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डा. परदेशी व इतर विभाग प्रमुख कर्मचारी सहभाग देणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन व समापन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होईल. हा कार्यक्रम येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ते सायंकाळी ५ या दरम्यान आयोजित केला जाणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर लघुपट पाहण्याची संधी मिळण्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच महोत्सवात भाग घेण्यासाठी आॅनलाइन किंवा महोत्सवस्थळी नोंदणीची आवश्यकता असून प्रवेश विनामूल्य उपलब्ध आहे, अशी माहिती फर्ग्युसन महाविद्यालयातील मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्निल कांबळे यांनी दिली आहे.
सहभागासाठी http://www.fergusonshortfilmfestivl.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येईल.