हिंगोली जिल्ह्यातील बन गावातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवली जीवन यात्रा

7

हिंगोली १८ मार्च २०२४ : हिंगोली जिल्ह्यात सेनगांव तालुक्यातील बन शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

सदर मयत शेतकऱ्याचे नाव अभिमान वाघ असून बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे. या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपविल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रभु नांगरे