शेतकर्यांचे आंदोलन हिंसक कि घातपात?….

नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२१: दिल्लीच्या कडकाच्या थंडीत सुरू असलेल्या शेतकर्यांचा आंदोलनाला गालबोट
लागले आहे काल देश ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता. तर दिल्लीत शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटल्याचे दिसत आहे. ज्यामुळे शेतकरी आंदोलन हे हिंसक झालं आहे.

दिल्लीतील या शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती ताणावपुर्ण झाली आहे. अक्रमक शेतकरी हे आपला आवाज पोहचविण्यासाठी थेट लाल किल्ल्यावर दाखल झाले. त्यांना बाहेर काढण्यात आलं असून आत जाता येऊ नये म्हणून लाल किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले असून अतिरिक्त पोलिस तैनात केला आहे.

शेतकऱ्यांकडून काल ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीने आपला मार्ग बदलत लाल किल्ल्यावर दाखल झाली. या हिंसक वळणामधे दगड, तलवारी चा ही समावेश होता. तर या ट्रॅक्टर ने पोलिसांच्या अनेक गाड्यांना धडक दिली आहे. तर बस पलटी करण्याचा प्रयत्न ही केला. मात्र, त्यामुळे दिल्ली धुमसत होती. शेतकर्यांच्या या हिंसकते मुळे दिल्ली पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

विरोधक संतापले…..

शेतकर्यांच्या या हिंसक परिस्थितीला केंद्र सरकार च जबाबदार आसून योग्य परिस्थिती हाताळता आली नाही. अशी टिका होत आहे. तर तसेच हे आंदोलन केंद्र सरकारनेच हिंसक केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. “आपलीच माणसं त्यामधे घुसवून शेतकर्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे.”असे ते म्हणाले.

“हा राजकीय डाव नसून.सरकारने टोकाची भूमिका सोडावी, पंजाबला अस्वस्थेकडे घेऊन जाऊ नका. त्यांना खलिस्तान बोलणे चुकीचे,केंद्र सरकारने शाहणपणाचे वागवं”असा खोचक टोला आणि ताशेरे राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार यांनी ओढले आहे. तर संजय राऊत यांनी ही “आजचा हा दिवस आणीबाणी सारखाच आसून, इतिहासातील काळा दिवस, सरकारच्या अंहकारामुळे हि परिस्थिती ओढावल्याची घणघणाती टिका केली.

तसेच केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभरातून नाराजीचे सूर उमटत आहे. तर सरकारवरच या आंदोलनात काही घातपात केल्याचे आरोप होतं आहेत. तर मोदी आणि शाह हे कृषी कायदे मागे घेण्यास तयार पण उद्योगपती करू देत नाहीत. अशीही प्रतिक्रिया उमटत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा