गूळ सौदे बंदमुळे शेतकऱ्यांना अडीच कोटींचा फटका

कोल्हापूर, ५ जानेवारी २०२३ : गूळ सौदे बंद पडल्यानंतर दरात १०० ते २०० रुपयांची घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या हंगामात आतापर्यंत तीन वेळा सौदे बंद पडले. या तिन्ही वेळी दरात घसरण झाल्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला.

आगोदरच मिळणारा दर आणि उत्पादनासाठी होणारा खर्च याचा तोळमेळ घालत असताना शेतकाऱ्यांना गूळ उत्पादन घेणे परवडेनासे झाले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरू झाला. गूळ हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले आठ-दहा दिवस सौदे सुरळीत सुरू होते.

उच्च प्रतीच्या गुळाला ४२०० ते ४५०० रुपये क्विंटल असा दर होता. दुय्यम प्रतीच्या गुळास सरासरी ३५०० ते ३७०० रुपये असा दर होता. उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या दरात २०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडतात. अशा स्थितीत वारंवार गुळ सौदे बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. मागील दोन्ही बंदच्या वेळी गुळच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा