धाराशिवमधील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड, शासनाकडुन अग्रीम रक्कम नंतर दुष्काळ अनुदान भेटणार

धाराशिव, १३ नोव्हेंबर २०२३ : धाराशिव जिल्हयात ७१% पाऊस झाल्यामुळे सोयाबिन पिकाला याचा फटका बसलाय. पावसाने दडी मारल्यामुळे ५७ महसुली मंडळातील सोयाबिन पिक शेतकऱ्याच्या हातातुन गेलय. जिल्हयातील अश्या बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकसान पोटी २५% अग्रीम रक्कम पिकविमा देवुन दिवाळी गोड केली आहे.

जिल्हयात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ट्रिगर १ ट्रिगर २ च्या निकषात धाराशिव, लोहारा, वाशी या तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुके म्हणुन जाहिर केले आहे. आता यांना दुष्काळग्रस्त म्हणुन अनुदान भेटणार आहे. जिरायतीसाठी प्रती हेक्टर ८५०० रुपये, बागायतीसाठी प्रती हेक्टर १७००० हजार रुपये, फळबागानां २२५०० रुपये प्रती हेक्टर अनुदान भेटणार आहे. विशेष म्हणजे २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होणार असुन इतर तालुक्यातील दुष्काळग्रस्त मंडळाना देखील अनुदान मिळणार आहे.

धाराशिव जिल्हयातील ४ कोटी ९८ लाख ७२० शेतकऱ्यापैकी, ३ कोटी ९८ लाख ९७६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २१८ कोटी पैकी १७४ कोटी ४० लाख रुपये जमा झालेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पिकविमा होणार आहे. २०२०, २०२१, २०२२ साला मधील थकीत पिकविमा ८९४ कोटी रुपये, सततच्या पावसाचे ६३ कोटी रुपये, १५ रुपये कांदा अनुदान हे पिकविमा अदयाप कंपनीकडे प्रलंबित आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा