नागपुरात शेतकरी -माथाडी चर्चासत्र संपन्न

नागपूर १४ ऑगस्ट २०२४ : हमाल माथाडींचा संबंध शेतीच्या कामात नाही. शेतमाल बाजारात येतो, तेव्हा दोघांचे नाते निर्माण होते. शेतकरी असला तरच माथाडी हमाल यांचें अस्तित्व असते. दोघांनाही मालाची व घामाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. तो अधिकार मिळावा, असे मत शेतकरी माथाडी समस्येवर बोलू या, या कार्यक्रमात डॉ. हरीश धुरट यांनी मांडले. राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीच्या वतीने पत्रकार भवन सभागृह येथे आयोजीत चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उदघाटन करताना जेष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे म्हणाले की, हमालांना काम असेल तर दाम मिळतो. हमाल या शब्दात मालच नाही, शेतकरी बाजार घटकांवर अवलंबून असतो. दोघांच्याही श्रमाला मोल मिळण्यासाठी एखादे विधेयक आले पाहिजे. वैद्यकीय सोयी त्रोटक आहे त्याचाही अधिकार मिळाला पाहिजे यासाठी संघटनेने प्रयत्न केले पाहिजे.

डॉ. राजाभाऊ टांकसाळे म्हणाले बाजार समित्यांची व्यवस्था दोन्ही घटकांच्या शोषणाची आहे. त्यात बदल करण्यासाठी सरकारकडे आग्रही असले पाहिजे. राष्ट्रीय कष्टकरी पंचायत तसा प्रयत्न करेल याची खात्री आहे. बाजार समित्यांचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. हमालासांठी आलेला १९६९चा कायदा अजूनही पोहचला नाही. दुर्गम भागातील १३हजार शाळा बंद पडल्या. मुलांच्या शाळेची दार बंद झाली तसेच हमाल शेतकरी हक्काचे दारं बंद होतील, त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन प्रभू राजगडकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन अकोल्याचे शेख हसन कादरी यांनी केले. महिंद्र आणि महिन्द्रचे राहुल वेळे, वाशिम कृउबा समितीचे संचालक हिराभाई जानीवाले, कारंजा बाजार समितीचे संचालक हसन चौधरी, अमरावती कृउबा समितीचे संचालक बंडू वानखेडे, यवतमाळ बाजार समितीचे संचालक किशोर बढे, आर्वी बाजार समितीचे संचालक दिलीप भुसारी, दर्यापूर बाजार समितीचे संचालक आशिफ पहेलवान, आर्णी बाजार समितीचे संचालक शेख गफूरभाई यांनी आपले विचार मांडल्यानंतर विदर्भातील सर्व जिल्ह्यात या प्रश्नावर मेळावे घेण्याचे आयोजकांनी घोषित केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा