पंजाबमध्ये आज तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे ‘रेल रोको आंदोलन’ सुरूच

अमृतसर, ३० सप्टेंबर २०२३ : पंजाबमधील अमृतसरमध्ये पुन्हा एकदा किसान मजदूर संघर्ष समितीने आणि शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात किमान आधारभूत किंमत कायदा तसेच अनेक प्रलंबित उपाययोजना लागू करण्यासाठी रेल रोको आंदोलन केले. आंदोलन आजही सुरू असून या निदर्शनाचा आज तिसरा दिवस आहे.

या आंदोलनामुळे जिथे शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत, तिथे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला. दरम्यान, आंदोलनामुळे अमृतसर-दिल्ली मार्गावरील गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही पंजाबच्या रेल्वे स्थानकांवर हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

१९ कृषी संघटनांनी ४ सप्टेंबर रोजी चंदीगड, पंजाब आणि हरियाणाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेतली होती. ही चर्चा निष्फळ ठरल्याने पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या १६ कृषी संघटनांच्या प्रतिनिधींनी पंजाबमध्ये रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. याआधीही २२ ऑगस्टपासून चंदीगडमध्ये कृषी संघटनांनी आंदोलन पुकारले होते, मात्र चंदीगडला पोहोचण्यापूर्वीच ते थांबवण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा