शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कापूस जाळो आंदोलन

श्रीगोंदा, दि.२३ मे २०२०: कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभर हजारो शेतकर्‍यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले,असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरु आहे. तसेच एफ ए क्यू च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्य व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरु करावी. या शेतकरी संघटनेच्या कापसासंबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी, पुर्ण महाराष्ट्रभर मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.

केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे. व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आसला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. नोड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मधुसुदन हरणे, वानराव चटप, सरोजताई काशिकर, शे.संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गिताताई खांडेभराड, सतिश दाणी, सीमाताई नरोडे, उ. विभाग प्रमुख शशिकांत भदाने आदी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी विशेष कामगिरी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा