फास्टटॅगला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : १ डिसेंबरपासून देशभरातील सर्व टोलनाक्यांवर फास्टटॅगची अंमलबजावणी सुरु करण्यात होणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र आता ती मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशी माहिती महामार्ग प्रशासनाने दिली आहे.
वाहनचालकांमध्ये अद्यापही संभ्रम अवस्था असल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने फास्टटॅग लागला आता १५डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

फास्टटॅग लावलेल्या चारचाकी वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. टोलनाका ओलांडत असताना गाडीच्या काचेवर लावण्यात आलेला फास्टटॅग स्कॅन होऊन वाहनचालकाच्या बँक खात्यामधून पैसे वळते होणार आहेत.

तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांमधून तुमची सुटका होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा