बारामती प्रादेशिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी उपोषण

11

बारामती, १६ ऑगस्ट २०२०: बारामती एमआयडीसीमध्ये अनेक भूखंड धारकांनी निवासी प्लॉटवर अवैद्यरीत्या बेकायदा बहुमजली इमारती उभारल्या असुन, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुल, गाळे सुरू केले आहेत. याबाबत ऍड. आकाश दामोदरे यांनी दोषींवर कारवाई करावी यासाठी काल १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे.

बारामती येथील मऔवी मंडळाचे प्लॉटधारकांनी या प्लॉटवर बेकायदेशीररित्या बहुमजली इमारत बांधून त्यामधून मोठे उत्पन्न मिळवत आहेत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार देखील केले आहेत. याबाबत मला लेखी आश्वासन देऊनदेखील ठरलेल्या वेळेत प्रादेशिक अधिकारी, म औ वि मं कार्यालय, जोग सेंटर वाकडेवाडी पुणे ३, म औ वि म यांनी माझ्यासोबत या प्लॉटची समक्ष पाहणी करावी असे आश्वासन देऊन माझी फसवणूक केली आहे.

तसेच येथील बरेच रिक्त प्लॉट हे गायब असल्याच्या व दि २४/१/२०२० रोजी दिलेल्या अधीक्षक अभियंता पुणे यांनी लेखी आश्वासनांचा अवमान करून फसवणूक करणाऱ्या कार्यकारी अभियंता बारामती व प्रादेशिक अधिकारी पुणे १ यांचेसह कर्तव्यात कसुराई करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून १५ ऑगस्ट २०२० पासून बारामती कार्यकारी अभियंता एमआयडीसी याच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव