उपवासाच्या पदार्थांवरच यंदा उपवासाची वेळ..

2

ठाणे, दि. २६ जुलै २०२०: श्रावण महिना सुरू होऊन आता जवळपास एक आठवडा होत आला आहे आणि मांस खाणारा वर्ग हा पूर्णपणे भाजीपाल्याकडे वळला आहे. नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण आणि याच सणापासूनच पुढील सणांना आणि उपवासाला सुद्धा सुरूवात होते. त्यामुळे उपवासात खवय्यांचा कल हा उपवासाचे नवनवीन पदार्थ खाण्याकडे वळतो आणि खवय्यांसाठी उपाहारगृह, हॉटेल सुद्धा नवनवीन पदार्थ बसवण्यास सुरूवात करतात आणि खवय्यांचा त्याला चागलांच प्रतिसाद मिळतो.

श्रावणात सणामुळे सतत पाहुण्याची वरदळ सुरू असते मात्र यावर्षी गोष्ट जरा वेगळी आहे. या वर्षी न बोलावलेला पाहुणा म्हणजे कोरोना हा सुद्धा आलाय. त्यामुळे खवय्यांना आणि उपाहारगृह, हॉटेल यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कारण कोरोना आणि लॉकडाउन मुळे लोकांचे बाहेर पडण मुश्किल झाल आहे आणि त्यातच बाहेरचे पदार्थ खाल्याने कोरोनाची लागण होण्याच्या भितीने खवय्ये सध्या हे सर्व टाळत आहेत मात्र याचा तितकाच फटका हा उपाहारगृह, हॉटेल यांना बसला आहे. श्रावणात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि याला खवय्यांचा प्रतिसाद मिळतो मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टीवर पाणी फिरलय आणि सोबतच त्यांच आर्थिक नूकसान ही झाल आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर आधीपासूनच हे पदार्थ बाजारात विक्रीसाठी येतात आणि उपवासाचे नविन पदार्थ हे महत्वाचे ठरतात. मात्र यंदा यातील काहीच झाल नाही अस विक्रेता तथा हॉटेल चालकांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी श्रावणात महिनाभर साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, उपवासाची इडली, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, थालीपीठ, वऱ्याचा भात, वऱ्याची खिचडी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, रताळ्याचा कीस, शिकरण, भाजणी, मलई मटका लस्सी, थालीपीठ कचोरी, पुरी भाजी, मसाला दूध, लस्सी, पीयष, गुळाचा खरवस, दुधी हलवा, शेंगदाणा चटणी, उपवासाची थाळी असे विविध चवीचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध केले जातात. त्यासाठी खास मेन्यू यादीच असते आणि खास ऑफर्स सुद्धा असतात

यंदा मात्र कोरोनामुळे काही उपाहारगृहांचे मालक ऑर्डरप्रमाणे हे पदार्थ बनवित आहेत. दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ महापालिकेने ठरवून दिली आहे. त्यात एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्यास सांगितल्याने ९० टक्के फटका बसला आहे अशी खंत उपहारगृहाच्या मालकांनी व्यक्त केली आहे आणि यात जास्त नूकसान होत ते म्हणजे महिला बचत गटाचे. त्यामुळे या अशा महामारीत घर कसं भागवायंच हा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांवरच यंदा उपवासाचीच वेळ आली आहे असे म्हणायला हरकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा