मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, एक ठार तर दोन गंभीर जखमी

5

पुणे २४ जून २०२३: मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील खंडाळा घाटातील आंदा पॉईंट येथे एका भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने, पिकअप टेम्पोला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

ही धडक एवढी जोरदार होती की कंटेनर थेट पिकअपवर पलटी झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेलल्या तसेच जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमींना तातडीने खोपोलीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी केमिकल ट्रकचा अपघात होऊन चार जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच, हा आणखी एक मोठा अपघात झाला. खंडाळा घाटातील आंदा पॉईंट येथे, पिकअप टेम्पोला मागून अति-वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरात धडक दिली आणि कंटेनर पलटी झाला. पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा