बोगोटा, १६ ऑक्टोबर २०२२: कोलंबियाच्या नैर्ऋत्य दिशेला पॅन अमेरिकन हायवेवर शनिवारी एका मोठ्या बसला भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.
20 killed in Colombia bus accident
Read @ANI Story | https://t.co/N49lSiY8Bl#columbia #busaccident pic.twitter.com/zrD2Xk8DEl
— ANI Digital (@ani_digital) October 15, 2022
या घटनेची माहिती देताना ट्रॅफिक पोलिसांच्या नारियो विभागाचे कॅप्टन अल्बर्टलँड अगुडेलो यांनी सांगितले की, या अपघातात दुर्दैवाने २० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पंधरा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एक तीन वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाचा सहभाग आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा अपघात नैर्ऋत्य कोलंबियाच्या पास्टो आणि पोपायन या दोन शहरांदरम्यान झाला. ही बस टुमाको या बंदरावरून कॅली येथे जात होती. या दोन्ही ठिकाणांमध्ये ३२० किमीचे अंतर आहे. दरम्यान, ही बस एका धुक्याने वेढलेल्या प्रदेशातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातस्थळी बचाव कार्य करण्यासाठी तब्बल नऊ तास लागले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.