महाराष्ट्रातील पाटोदा येथे भीषण रस्ता अपघात, ४ ठार तर २ जखमी

बीड, २९ जून २०२३: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसीलजवळ भीषण रस्ता अपघात घडला असुन यात चार जणांचा मृत्यू झालाय, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अहमदनगर महामार्गावर जाटनांदूर फाट्याजवळ हा अपघात झाला. टेम्पो आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे स्कॉर्पिओमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

सध्या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सायंकाळी पाटोदा तहसीलमधून जात असताना टेम्पोने स्कॉर्पिओला धडक दिल्याने हा अपघात झाला. चार मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांची चौकशी सुरू झालीय, अपघाताचे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही वाहनांचा अपघात झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने ही वाहने बाजूला केली आणि यानंतर वाहतूक सुरू झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा