पुण्यात धक्कादायक घटना, पिकनिकला गेलेल्या बाप- लेकीचा धरणात बुडून मृत्यू

पुणे, १६ ऑगस्ट २०२३ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सहलीला गेलेल्या ४५ वर्षीय पुरुष आणि त्याची १३ वर्षीय मुलीचा भाटघर धरणात पोहताना बुडून मृत्यु झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. भोर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या असे पीडितेचे नाव आहे.

हे दोघेही आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसह धरणाजवळ असलेल्या भोर तालुक्यातील पसुरे गावाजवळ सहलीसाठी आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, शिरीष आणि ऐश्वर्या पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात शिरले. ते अशा ठिकाणी होते जेथे पाणी खोल नव्हते परंतु दोघेही बुडाले. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी आरडाओरडा केला. पोलिसांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि संध्याकाळी उशिरा मुलीचा मृतदेह सापडला तर आज बुधवारी सकाळी तिच्या वडिलांचा मृतदेह सापडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा