गोंदिया १९ ऑगस्ट २०२४ : मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून जन्मदात्या बापानेच पोटच्या पोराची हत्या केल्याची घटना गोंदियाच्या देवरी तालुक्यातील मुल्ला गावात घडलीय. मृत हंसराज नारायण मुनेश्वर (३२) याला दारूचे व्यसन असल्यामुळे वडिलांसोबत त्याचे कायम भांडण आणि वाद होत असायचा.
घटनेच्या दिवशीही हंसराज दारू पिऊन घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले. भांडण एवढे विकोपाला पोहोचले की भांडणाचे स्वरूप हातापायी वर बदलले. यातच बाप-लेकाच्या भांडणात मुलाच्या डोक्याला जबर मार लागून तो ठार झाला. घटनेची माहिती कळताच देवरी पोलिसांनी लगेच धाव घेत पंचनामा करुन श्वान पथकाच्या मदतीने काही तासातच आरोपीला अटक केली. तर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनीधी : नविन दहिकर











































