महिला डॉक्टरांची आपल्या सहकाऱ्याच्याच विरोधात विनयभंगाची तक्रार

बारामती, २७ सप्टेंबर २०२०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जम्बो हॉस्पीटल’च्या बाबतीत तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा सज्जड दम नुकताच दिला होता. आता नुकतीच याच जम्बो सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना घडलीय.

या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी योगेश भद्रा आणि अजय बागलकोट या दोन डॉक्टरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही डॉक्टरांची या जम्बो हॉस्पिटलमध्ये एका खाजगी एजन्सी मार्फत नेमणूक करण्यात आली आहे. पीडित महिले सोबत काम करत असलेले डॉक्टर गेल्या एका महिन्यापासून महिला डॉक्टरला उद्देशून अश्लील भाषेत बोलत होते. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र, त्यानंतर या दोघांनी तिला जास्त प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली. या सगळ्याला कंटाळुन अखेर त्या महिला डॉक्टर’नं दोघां डॉक्टरांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा