पाकच्या कराची विद्यापीठावर फिदाईन हल्ला : 3 चिनी महिलांसह 5 ठार; बलुच संघटनेने स्वीकारली जबाबदारी

12

कराची, 27 एप्रिल 2022: पाकिस्तानातील कराची शहरातील एका विद्यापीठावर मंगळवारी दुपारी फिदाईन हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झालाय. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारजवळ हा हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या 5 जणांपैकी तीन चीनमधील महिला प्राध्यापक आहेत. चौथा पाकिस्तानी ड्रायव्हर आणि पाचवा गार्ड आहे.

कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी द न्यूज वेबसाइटला सांगितलं की, हा फिदाईन हल्ला होता आणि तो बुरखा घातलेल्या महिलेने केला होता. ठार झालेल्यांमध्ये तीन चिनी महिला प्राध्यापक, त्यांचा ड्रायव्हर आणि गार्ड यांचा समावेश आहे. दोन जखमींची प्रकृती गंभीर आहे.

बलुच लिबरेशन फ्रंट (बीएलए) च्या मजीद ब्रिगेडने हा हल्ला केला होता. महिला फिदाईनचं नाव शरी बलोच असल्याचं सांगण्यात आले असून तिचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आलाय.

घटनेनंतर गोळीबार

नबीने आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. यानुसार घटनेनंतर गोळीबार झाल्याचे समजते. रेंजर्स नी सांगितलं की, “स्फोटानंतर रेंजर्सची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यातील चार जण जखमी झाले असून त्यांना गोळ्या लागल्या आहेत. याचा अर्थ त्या महिलेसोबत आणखी काही लोक होते जे कॅम्पसमध्येच उपस्थित होते. आम्ही या लोकांना शोधत आहोत.”

मिळालेल्या माहितीनुसार, बलुच लिबरेशन फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याच संघटनेने गेल्या महिन्यात गिलगिटमधील लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. यामध्ये 22 सैनिक आणि 4 नागरिकांचा मृत्यू झाला.

जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या अगदी समोरच्या भागात एक कार उभी होती. त्याजवळ अनेक विद्यार्थी उपस्थित होते, तर काही विद्यार्थ्यांचे पालकही प्रवेश प्रक्रियेमुळे उपस्थित होते. समोर एक सभागृह आहे, त्याला कन्फ्यूशियस हॉल म्हणतात. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये बॉम्ब होता त्या गाडीत काही लोक बसले होते.

सिंधचे मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देणार

कराची हा सिंध प्रांताचा भाग आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार येथे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.

बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी हजर

पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घालून तपास सुरू केलाय. काही सूत्रांनी दावा केलाय की कार गॅस सिलिंडरमधून चालवली जात होती आणि त्यात स्फोट झाला. मात्र, नंतर पोलीस प्रमुखांनी हा गॅस सिलिंडरचा स्फोट नसून फिदाईन हल्ला असल्याचे स्पष्ट केले आणि हा हल्ला बुरकांशी या महिलेने केला होता. बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय.

महिला होती फिदाईन हल्लेखोर

वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार असद अली तूर यांनी पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की – कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यात एक महिला देखील होती. बाहेर आल्यानंतर तिचा स्फोट झाला. ठार झालेल्या चौघांपैकी तीन महिला चीनच्या नागरिक आहेत. चौथा व्यक्ती गाडीचा पाकिस्तानी ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा