उरुळी कांचन येथील पंधरा जणांचा अहवाल निगेटिव्ह

उरुळी कांचन : येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या २१ जणांपैकी १५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये संबंधित महिलेचा पती, दोन मुलगे, एक मुलगी, सहा नातेवाईक, संबंधित महिलेवर उपचार करणारे स्थानिक डॉक्‍टर, नर्सेस व संपर्कातील इतर अशा एकूण पंधरा जणांचा समावेश आहे.
दरम्यान, संबंधित महिलेवर लोणी काळभोर येथे उपचार झालेल्या खासगी रुग्णालयातील तीन संबंधितांचा, तसेच महिलेच्या अन्य तीन नातेवाइकांच्या चाचण्या प्रलंबित आहेत, अशी माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली.
उरुळी कांचनमधील ४७ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी (दि.१७) आढळून आले होते. संबंधित महिला पोटाचा विकार असल्याने त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

                                                                                                       -ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा