तुळजापूर मधील बैठकीत आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले महत्त्वाचे मुद्दे

उस्मानाबाद, २१ ऑक्टोबर २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीत, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर मांडले. उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तर, ओल लागलेल्या पिकांचे नुकसान हे पिक विमा कंपन्यांच्या अटीमध्ये बसत नसल्याचे निदर्शनास आणून दिले, यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.

ज्या शेतकऱ्यांची जमीन पूरसदृश्य परिस्थितीमुळे खरवडून गेली आहे त्या शेतकऱ्यांना रब्बीचे पीक हे घेता येणार नाही. कारण, झालेल्या अतिवृष्टीमुळे आता परत माती व गाळ उपलब्ध होण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. अशा शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक असल्याचा महत्त्वाचा मुद्दा देखील त्यांनी या बैठकीत मांडला. यासोबतच, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नाही परंतु त्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील मदत करणे आवश्यक आहे. दसरा दिवाळी सारखे मोठे सण जवळ आले आहेत. यामुळे, ही मदत लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. असे विविध प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मांडून हे मुद्दे निदर्शनास आणून दिले.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा