उस्मानाबाद, ७ जुलै २०२०: कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व कामकाज चालले आहेत. या संकटकाळात कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळवण्यासाठी उमरगा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिनांक ६ जुलै २०२० ते १० जुलै २०२० या काळात मनाई आदेश अंमलात आहेत.
मात्र, संबंधित आदेशाचे उल्लंघन करत आज दिनांक ७ जुलै रोजी १२.३० वाजता सुनील भालचंद्र निरंकारी यांनी उमरगा येथील सु. गुंजोटी रोड लगतच्या गाळ्यासमोर कपड्याचे स्टॉल व्यवसायासाठी चालू ठेवले असताना उमरगा पोलीस ठाणे च्या पथकास आढळले.
यावरून पोलीसांनी संबंधित व्यक्ती विरोधात भा. दं.सं. कलम १८८ सोबतच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) अन्वये आज दिनांक ७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.