बारामतीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल 

पुणे, दि. ७ जुलै २०२०: बारामती तालुक्यात एका अल्पवयीन मुलीशी छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. बाहेर खेळायला गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तीच्याशी अश्लील संभाषण केल्याने एका तरुणाच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रोहिदास जाधव ( रा.शारदानगर, माळेगाव कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहरापासून जवळ असणाऱ्या शारदा नगर येथे घडलेल्या घटनेची हकीकत अशी दि ३ जुलै शनिवारी पीडित अल्पवयीन मुलगी घराशेजारील इरिगेशनच्या बागेत फुले तोडण्यास गेली असताना तेथे आरोपीने येऊन त्या मुलीला ” तू आता आठवीला आहेस तुला सगळं कळतंय, तू माझ्या जवळ ये ” असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्याजवळ येऊन लगट करू लागला.

मुलगी घाबरून तिथून घरी गेली आणि  घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर फिर्यादीच्या आईने त्या आरोपी तरुणाच्या मामीला घडलेला प्रकार सांगून आरोपीस समजावून सांगण्यास सांगितले. परंतू याचा राग मनात धरून आरोपी तरुण दि.४ जुलै रोजी मुलीच्या घरासमोर येऊन घडलेली घटना तुम्ही माझ्या मामला व मामीला का सांगतली असे म्हणत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन पुढील तपास फौजदार खाडे करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:  अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा