सासवड येथे खाजगी सावकार विरोधात पहीला गुन्हा दाखल

पुरंदर, २४ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन मध्ये एका अवैध खाजगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या आवाहनानंतर खाजगी सावकारकी संदर्भात हा पहिलाच गुन्हा आज दाखल झाला आहे.

जिल्ह्यामध्ये खाजगी सावकारकीच्या अनेक घटना घडत आहेत. खाजगी सावकारांकडून होणाऱ्या अन्यायामुळे अनेकांनी जीव दिल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकांच्या जमिनी सावकारांनी लुबडल्या आहेत. म्हणूनच पुणे जील्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षकअभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात खाजगी सावकारान विरोधात मोहीम उघडली आहे. पुरंदर भोर चे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सुध्दा पिढीत लोकांनी खाजगी सावकारां विरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले होते. याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. अनेकांनी खाजगी सावकारी बंद केली आहे. तर आता लोकही खाजगी सावकार विरोधात तक्रार देण्यास पुढे येत आहेत.

आज पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन मध्ये एका खाजगी सावकार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिवे येथे राहणारे शंकर सोपान टिळेकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेबर २०१९ मध्ये त्यांनी मारूती रामचंद्र औताडे राहणार दिवे ता. पुरंदर यांच्या कडून १० लाख रुपये उसने घेतले होते.त्या मोबदल्यात सिक्युरिटी म्हणून औताडे यांनी टिळेकर यांची १५ गुंठे जमीन मुदत खरेदी करुन घेतली होती. या जमीनीची बाजार भावानुसार किंमत ५७ लक्ष रूपये आहे. ती औताडे यांनी परस्पर लहूजी गंगाराम भापकर यांना विक्री केली आहे. जमीन परत मागितली असता त्यांनी तक्रारदारास दमदाटी केली. तसेच जमिन परत हवी असल्यास १० लाखाच्या व्याजासह ५५ लाख रूपयांची मागणी केली आहे.

पोलिसांनी या बाबत महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम २४, ३१, ३९, ४३, ४५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत.
पुरंदर भोर चे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी लोकांना खाजगी सावरकरांविषयी माहिती देण्याचं आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा