पंधरा दिवसांत खड्डे बुजवा नाहीतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं तक्रार करणार- दादा भुसे

नाशिक, १ नोव्हेंबर २०२२ : मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. मागील काही दिवसांपासून नाशिक शहर आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळं नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळं पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून प्रशासनाला धारेवर धरलंय. काही दिवसांपूर्वी नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून छगन भुजबळ आक्रमक झाले होते. आता पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ आणि मनपा प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत दादा भुसे आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी पंधरा दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करेल असा इशारा दिलाय.

यावर्षी नाशिकसह राज्यभारात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः वाताहात झालीय. नाशिक शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्यावरून दोन दोन फुटापर्यंत खड्डे पडलेले आढळून आलेत. काही ठिकाणी तर रस्ता खचल्यानं वाहने अडकून पडली होती.
पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांनी नागरिक त्रस्त आहेत. तर खड्डे आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्या धूळीमुळं नागरिक त्रासले आहेत.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मनपा प्रशासनाकडून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेतलाय. मागील पंधरा दिवसा पूर्वी सूचना देऊनही शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीत बदल न झाल्याने पालकमंत्री दादा भुसे बैठकीतच आक्रमक झाले आणि त्यांनी मनपा प्रशासनाला इशाराच दिला, पंधरा दिवसांत खड्डे बुजवा नाहीतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं तक्रार करंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा