सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार…?

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२०: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात असा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत तयारी करण्यास सुरुवात केली होती. यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यापीठांमधील कुलगुरू आणि न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती. याअंतर्गत काल अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा घेतल्या जाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आज बारापर्यंत हा निर्णय येणे अपेक्षित असल्याचे देखील सांगण्यात आलं होतं.

आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच या अंतिम वर्षाच्या परीक्षा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे”.

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

“परीक्षा नेमकी कधी सुरु होईल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की, आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या घेतली असं होणार नाही. पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्याासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा