अखेर अजित पवार बोलले….

मुंबई २५ जुलै, २०२२: विरोधी पक्षनेत्याच्या पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड होऊन एवढे दिवस झाले, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तुमच्याकडे जर बहुमत आहे, तर अजूनही विस्तार का करत नाही, असा सवाल त्यांनी शिंदे गटाला केला.

पावसाने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक धरणं ही जुलै महिन्यातच भरली आहे. तेव्हा अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई देणं सरकारला होत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं, हा जनतेचा अपमान आहे, असं सांगायला ते विसरले नाही. एवढं बहुमत घेऊन एकनाथ शिंदेचं समाधान झालं नाही का? अजून किती मतांची भूक आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर आरोपांच्या फैरीच झोडल्या. तातडीने अधिवेशन बोलवा. असेही त्यांनी वारंवार नमूद केले.

सभागृहात आमच्याबरोबर असताना ज्या कामांना मंजुरी दिली होती, त्या कामांना स्थगिती देण्याची त्यांनी सुरुवात केली आहे. हे शिंदे-फडणवीसांचे सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली. यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हंत. मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरे करावेत, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण शेतकरी मित्रांचे प्रश्न सोडवावे, असे आवाहन अजित पवारांनी केले. त्यांना बि-बियाणे, रोपे, या आवश्यक गोष्टी त्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यपालांनाही सोडले नाही. एकुणातच अजित पवार या पत्रकार परिषदेत आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्षाची भूमिका निभावतना त्यांनी शिंदे गटांकडून खूपच अपेक्षा ठेवल्या आहेत. पण आता त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का अपेक्षा भंग होईल, हे लवकरच समजेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा