अखेर ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा, 41 मंत्र्यांच्या बंडानंतर पायउतार होण्यास भाग

युके, 7 जुलै 2022: ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिलाय. असा दावा ब्रिटीश मीडिया स्काय न्यूजने केला आहे. तथापि, बीबीसी आणि वृत्तसंस्था रॉयटर्सचं म्हणणं आहे की जॉन्सन पायउतार होण्यास तयार आहेत आणि आज राजीनामा देऊ शकतात.

बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात त्यांच्याच कंझर्व्हेटिव्ह पक्षात बंडखोरी झाली. आतापर्यंत 41 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. विरोधी लेबर पार्टीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होता.

तथापि, बोरिस जॉन्सन नवीन पंतप्रधान निवडून येईपर्यंत पदावर राहतील. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये नवीन पंतप्रधान निवडले जाईपर्यंत बोरिस जॉन्सन या पदावर राहतील.

अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या राजीनाम्याने बोरिस जॉन्सन यांच्या खुर्चीवरील संकटाला सुरुवात झाली. 5 जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनीही राजीनामा दिला. आतापर्यंत चार कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये ऋषी सुनक आणि साजिद जाविद यांच्याशिवाय सायमन हार्ट आणि ब्रँडन लुईस यांनीही राजीनामा दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा