मुंबई, 27 जानेवारी 2022: शेअर बाजाराच्या जगात बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची एअरलाइन-आकासा एअर मे किंवा जूनमध्ये उड्डाण करू शकते. विमान कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, ते मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला बोईंग 737 MAX विमानाच्या प्राप्तीसह उड्डाण करण्यास तयार आहे. कंपनीला एप्रिलमध्ये बोइंग 737 मॅक्स विमान मिळणार आहे, पुढील महिन्यापासून विमानसेवा सुरू होईल.
कंपनीनं काय म्हटलं?
आकाश एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “आम्हाला आमचं पहिलं विमान एप्रिलच्या मध्यात मिळंल आणि आम्ही मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पहिलं व्यावसायिक उड्डाण सुरू करू.” दुबे म्हणाले, “आम्ही सरकार, डीजीसीए सोबत सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत.” मार्च 2023 च्या अखेरीस विमान कंपनीच्या ताफ्यात 18 विमानं ठेवण्याची योजना आहे. आकाश एअर बजेट एअरलाइन म्हणून उड्डाण करंल. आकाश एअरनं 72 बोईंग 737 MAX विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यात इंधनाचा वापर कमी आहे.
या शहरांसाठी उड्डाणं करतील
विनय दुबे सांगतात, सुरुवातीला आकाश एअर महानगरांपासून टियर-2 आणि टियर-3 श्रेणीतील शहरांसाठी सेवा सुरू करंल. महानगरांपासून मेट्रोपर्यंत उड्डाणेही असतील. ते म्हणाले की, मेट्रो ते मेट्रोपर्यंत उड्डाणे देखील असतील जेणेकरुन विमान प्रणालीभोवती फिरता येईल. यासोबतच कंपनीनं यासाठी भरतीही सुरू केल्याचे त्यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे