अखेर राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर..

पुणे, १० ऑक्टोबर २०२२ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम अयोध्या दौऱ्यावरून चर्चेत आहेत. राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्या दौऱ्यावर जाण्याचं जाहीर केलं, तेव्हा त्यांना भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावे. या सगळ्या वादानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.

पण आता अयोध्येतील हुनमंत गढी महंत राजुदास महाराज, महंत धरमदास आणि विश्व हिंदु सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना खास अयोध्येला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले.

यावेळी बोलताना महंत राजुदास यांनी सांगितले, राज ठाकरे यांच्याबरोबर आमची अनेक विषयांवर चर्चा झाली. ते यापूर्वीच अयोध्येला येणार होते. पण काही कारणामुळे तो दौरा रद्द करावा लागला. पण यंदा मी नक्कीच येईन. असे आश्वासन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे सनातन धर्माच्या पुढे जात असल्याचा गैरसमज बृजभूषण सिंह यांचा झाला होता. त्यामुळे मागच्या वेळी हा दौरा रद्द करावा लागला, असंही महंत यांनी नमूद केलं. त्यामुळे आता लवकरच राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर गेल्यास नवल वाटायला नको.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा