अखेर मुख्यमंत्री अवतरले …

4

एकुणातच सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरा नाजूक साजूकच म्हणावे लागेल. गेले अनेक दिवस मुख्यमंत्री पडद्याआड गेले असं म्हणताना अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांबरोबर संवाद साधला.व्हिडिओ कॅान्फरन्सींग द्वारे उद्धव ठाकरे जनतेसमोर आले. यावेळी त्यांनी काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली आणि अनेक गोष्टी बोलून दाखवल्या.

यावेळी बोलताना त्यांनी आता दिल्ली काबीज करायची आहे, या मुद्द्यांवर हात घातला. सेनेतल्या गद्दारांनी चालते व्हा, अशा लोकांचे आम्हाला गरज नाही,असं म्हणत सेनेतून बाहेर पडलेल्यांना टोला लगावला. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नाही, असं म्हणत भाजपवर टीकाही केली. देशात पुन्हा शिवसेनेची लाट आणायची आहे. काही राज्यात भाजपने सरकारे पाडून सत्ता आणली आहे. तेव्हा कंबर कसून कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी काळ्यावाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवू. प्रत्येक निवडणूक जिंकायचीच आहे, तेव्हा जिद्दीनी लढा.

मी लवकरच बाहेर पडेन असं म्हणून शिवसैनिकांना आधारही दिला आहे. हातात बळ नसेल तर एकहाती सत्ता शक्य नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी सांगताना मुद्दाम राष्ट्रवादीचा संदर्भ देत सांगितले की राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांप्रमाणे आपणही प्रचारात उतरायला हवे.

तात्पर्य काय तर मुख्यमंत्री शरद पवारांच्या ओंजळीने पाणी पित आहेत का असा सवाल अजाणतेपणाने निर्माण झाला आहे. तेव्हा आता शिवसेना काय पाऊल उचलते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा