बारामती, १० फेब्रुवरी २०२१: शहरातील अशोक नगर येथील सदनिका (फ्लॅट) भाडेकरूने बळकवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरुद्ध एका ज्येष्ठ दाम्पत्याने शहर पोलीस स्टेशनकडे न्याय मागितल्यावर कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांनी भाडेकरूला बोलाऊन त्याच्याकडून सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास देण्याची लेखी हमी घेतली. त्यामुळे आता काही दिवसात ज्येष्ठ दाम्पत्यास त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे.
शहरातील शिक्षक असणारे कै. श्रीकांत प्रभुणे व त्यांच्या पत्नी कै. उषा प्रभूणे यांच्या मालकीचे अशोक नगर येथे घर आहे. हे घर प्रभुणे यांनी एका शिक्षक दांपत्यास भाडे तत्वावर दिले होते. प्रभुणे पती पत्नीचे निधन झाल्यावर कायदेशीर रित्या मा. कोर्ट आदेशानुसार वारस म्हणून प्रभुणे यांचे बंधु संजय गजानन प्रभूने (रा.सासवड) यांच्या नावावर घर झाले आहे. परंतु, भाडेकरू शिक्षक दाम्पत्य घराचे भाडे देत न्हवते. तर तुम्ही विकत घ्या म्हटले तर विकत घेत नव्हते व घर देखील सोडत न्हवते.
अखेर हतबल होऊन प्रभूणे यांनी शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांना आपली व्यथा सांगितल्यावर भाडेकरू दाम्पत्यास पोलीस स्टेशन ला बोलावून खडसावल्यावर या दाम्पत्याने हे घर लवकरच प्रभुणे यांच्या ताब्यात देण्याचे लेखी दिले आहे. प्रभुणे दाम्पत्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानले.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौंजदार संदीपान माळी, पोलीस हवालदार अनिल सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे सहभागी होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक ठिकाणी विविध माध्यमातून फसवणूक होत असते. ज्येष्ठ नागरिकांनी न भिता तक्रारी साठी पुढे यावे. त्यांना सहकार्य करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशन कटिबद्ध असल्याचे शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव