गोल पोस्ट इतर राजकारण अखेर शिंदे गटाची ढाल-तलवार सज्ज

अखेर शिंदे गटाची ढाल-तलवार सज्ज

मुंबई, ११ ऑक्टोबर, २०२२ : अखेर शिंदे गटाला तीन पर्यायापैंकी ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हानुसार शिंदे गट लढाई लढण्यासाठी आता ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाल्यामुळे आता हा सामना चुरसीचा होणार आहे. पण ही चिन्हे तात्पुरती असून धनुष्यबाणासाठीची लढाई सुरुच आहे.

यावेळी नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, ढाल-तलवार हा शिंदे गटासाठी शुभ शकून असून त्यामुळे आता शिंदे गट अजून जोमाने कामाला लागेल, हे खरं.
तर १९६७ मध्ये ठाण्यातून शिवसेना लढत असताना शिवसेनेचे ढाल-तलवार हेच चिन्ह होते. त्यामुळे आम्ही आता याच चिन्हाने पुढे पाऊल टाकत आहोत, हे खरं. असेही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

तर विरोधी गटातले अंबादास दानवे यांनी सांगितले ढाल ही भाजप असून तलवार ही गद्दारीची असल्याचा टोमणा मारला.
त्यामुळे आता मशाल विरुद्ध ढाल-तलावर हा सामना निवडणूकीत पहायला मिळणार… कोण जिंकणार कोण हरणार हे काळच ठरवेल…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version