सोलापूर जिल्ह्यातील कोव्हीड हाॅस्पीटल मध्ये कोरोना पॉझिटीव्ह पेशंटची आर्थिक लुट त्वरित थांबवावी – सचिन जगताप

माढा दि.३ नोव्हेंबर २०२०:सोलापूर जिल्ह्यात कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची आर्थिक लुट मोठ्या प्रमाणात होत आहे ,ह्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत, हॉस्पिटलमध्ये कसलीही स्वच्छता नाही, बायोमेडिकल वेस्ट सगळीकडे पसरलेले आहे, कोणत्याही पेशंट ला नाश्ता,चहा,काढा, जेवण दिले जात नाही, पेशंटला डिस्चार्ज देते वेळी संपूर्ण बील भरुन घेतात परंतु त्या हॉस्पिटल , मेडीकल, लॅबोरेटरी, बीलाची कोणत्याही प्रकारची पावती देत नाहीत, हॉस्पिटलचा प्रिंटर खराब झालेला आहे २ दिवसांनी या असे सांगतात, २ दिवसांनी गेल्यावरही अजुन बिल तयार झाले नाही,२/३ दिवसानी या अशी उडवाउडवीची उत्तरे देतात,कॉल केल्यावर कॉल रिसिव्ह करतं नाहीत, स्पेशल रूमच्या नावाखाली कोणत्याही सुविधा न देता प्रत्येक दिवसाचे २ हजार रुपये जादा बिल घेतात, काही पेशंट चे १ दिवसाचे ९० हजार रुपये बिल घेतले आहे, ब-याच पेशंटच्या नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क साधुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.या हॉस्पिटल बद्दल ब-याच तक्रारी पेपरमध्ये,व न्यूज चॅनेलला आलेल्या आहेत.

आम्ही जेव्हा याबद्दल संबधित हाॅस्पीटल कडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, आम्ही करतो ते योग्यच करतो, तुम्ही पेशंटला नाश्ता ,जेवण देत नाही तरीसुद्धा तुम्ही पैसे घेतात असे बोलले असता आम्हाला शासकीय ऑडिटरनी घेण्यास सांगितले आहे अशी उत्तरे डॉक्टरांनी दिली तसेच स्पेशल रूमचे २००० रूपये जादा, नियमबाह्य आहेत असे बोलले असता, ते चार्जेस आम्हाला ऑडिटर यांनी घेण्यास सांगितले आहेत असे बोलले, तसेच मेडिकल बिल व व लॅबचे बिल यांचा व माझा काहींही संबंध नाही अशी उत्तरे त्यांनी दिली, तुम्हाला काय करायचे ते करु शकता असे डॉक्टरांनी सांगितले, हॉस्पिटलची बील आकारणी शासन निर्णय २१ मे २०२० च्या आदेशानुसार घेणे बंधनकारक असताना,४००० –७५०० –व ९००० असे तीन प्रकारचे चार्जेस घेणे बंधनकारक असताना, स्पेशल रूमचा कुठेही उल्लेख नसताना ,कोव्हीड हाॅस्पीटल मध्ये प्रत्येक दिवसाचे २००० रु जादा बील घेतात, तसेच सर्व स्कॅन, प्रयोगशाळा तपासण्या यांची दर आकारणी ३० डिसेंबर २०१९ च्या शासन नियमाप्रमाणे घेणे बंधनकारक असतानाही, जादा दर आकारणी केल्याचे दिसून येत आहे, आम्हाला शासनाने कोणतेही दरपत्रक दिले नाही तुम्ही कितीही चार्ज घेऊ शकता असे शासनाने सांगितले आहे असे मेडिकलवाले व लॅबचालक सांगतात, यासंदर्भात आम्ही माढा तालुक्यातील ऑडिटर यांना भेटलो असता त्यांनी या सर्व प्रकरणाची लवकर चौकशी करून योग्य न्याय देण्यास आश्वासन दिले.

परंतु आज अखेर कोणतीही तपासणी अथवा कारवाई झालेली दिसून आली नाही तेव्हा तात्काल हॉस्पिटल ची तपासणी लवकरात लवकर करावी, कोरोना हॉस्पिटल कधी चालू झाले, किती पेशंट आज अखेर डिस्चार्ज झाले, सर्व पेशंटची कॉल करून काय काय सुविधा मिळाल्या याची चौकशी करावी, तसेच किती बिलाची आकारणी केली याची चौकशी करावी, तसेच दोनशे ते तीनशे रुपयाला मिळणारे पीपीई किट पेशंट कडून दोन हजार रुपये प्रत्येक किटला घेतात म्हणजे एका किट मागे ७ ते ८ पट जादा बिलाची आकारणी केली आहे हॉस्पिटलची सीसीटीव्ही फुटेज पहावे,कोण कोणत्या सुविधा दिल्या जातात ते स्वतः पहावे तसेच हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कोरोना पेशंट साठी चालू असताना कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ दिलेला नाही. या योजनेचा फलक ही कुठे हॉस्पिटलमध्ये लावलेला दिसून येत नाही याचीही चौकशी आपल्या स्तरावर व्हावी. हॉस्पिटल बिलाचे , मेडिकल बिलाचे , लॅबोरेटरी बिलाचे ऑडिट लवकरात लवकर करून ज्यादाआकारणी केलेले बिल व न दिलेल्या सुविधा यांचे पैसे पेशंटना परत करावेत व संबंधित डाॅक्टर ,फार्मासिस्ट ,व लॅबचालक यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करुन त्यांचेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.व पेशंटला लवकरात लवकर न्याय द्यावा व इथून पुढे होणारे पेशंटची लूट थांबवावी. तसेच केलेल्या चौकशीचा व कार्यवाहीचा अहवाल तक्रारदार यांना मिळावा , अन्यथा संभाजी ब्रिगेड सोलापूर यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी ही विनंती असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी यांचेकडे निवेदन दिले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,जिल्हा सचिव सुहास टोणपे,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे,माढा ता.कार्याध्यक्ष भारत लटके, उपाध्यक्ष अविनाश पाटील, सचिव गणेश डोके,विभागप्रमुख सचिन पराडे,शंकर उबाळे आदी

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा