पुणे, 11 मे 2022: देशभरात वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांना गेल्या एक महिन्यापासून ब्रेक लागला आहे. आज (बुधवार), 11 मे 2022 रोजी राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 07 एप्रिलपासून देशभरात स्थिर आहेत.
भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. त्याच वेळी, दिल्लीत डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 104.77 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 115.12 रुपयांना विकले जात आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे.
याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे विकले जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या भिन्न दरांमुळे, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price या संकेस्थळावर जावा.
दररोज अपडेट केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे