जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी फीचर्स

पुणे, दि. १७ जून २०२०: व्हाट्सअप सध्या जगभरात एक पॉप्युलर बनले आहे. केवळ सोशल मीडियापर्यंत सीमित न राहता आता आहे दैनंदिन कामांमध्ये देखील लोकांना उपयोगी पडत आहे. तुमचे दैनंदिन कामे सुलभ होण्यासाठी आता व्हाट्सअप मध्ये आणखीन नवीन फीचर्स येणार आहेत. तर जाणून घेऊया या नवीन पिक्चर्स बद्दल.

१) व्हाट्सअप मध्ये जेव्हा आपण शेअर चॅट मधले व्हिडिओ शेअर करतो तेव्हा त्या लिंक ओपन करून बघाव्या लागतात परंतू आता यासाठी व्हाट्सअप मध्ये वेगळा व्हिडिओ प्लेयर देण्याची शक्यता आहे

२) व्हाट्सअप मध्ये आता फेसबुक प्रमाणेच पिक्चर इन पिक्चरचे ऑप्शन , शेअर चॅटचे व्हिडिओ पाहण्यासाठी असणार आहे.

३) आयफोन युजर्संसाठी लवकरच वेबवर सर्च इमेज फीचर येवू शकतो.

४) डार्क मोडवर स्विच केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बबल नवीन कलरमध्ये आणण्याचे काम सुरु आहे.

५) पूर्वी व्हाट्सअप मध्ये एखादा मेसेज शोधण्याचे झाले तर पूर्ण स्क्रोल करून त्या तारखेपर्यंत शोधावे लागत होते त्यामध्ये प्रचंड वेळ खर्च होत होता परंतू आता तारिख टाकून असे मेसेज आता शोधता येणार आहेत.

६) आता व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज वापर विभाग रिडिझाईन करीत आहे.

७) व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक अपग्रेडेड डिलीट मेसेजवरही काम सुरु आहे. यामुळे युजर्संना खूप सारे मेसेज डिलीट करावे लागणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा