पुण्याच्या व्हीव्हीआयपी लग्नात कोरोना नियम मोडल्याबद्दल एफआयआर, माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते पाहुणे

पुणे, २३ फेब्रुवरी २०२१: महाराष्ट्रात पुन्हा कोरोना आपत्तीत वाढ झाली आहे. ठाकरे सरकारने कोरोनाची वाढती घटना लक्षात घेता सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुण्यात एका व्हीआयपी विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विवाह सोहळा माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या घरातील होता. पुष्कळ व्हीव्हीआयपी त्यांच्या मुलाच्या लग्नात मास्क न घालता आलेले दिसले. यामध्ये माजी मुख्यमंत्री व मंत्रीही सहभागी होते.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्स चे मालक विवेक मगर आणि व्यवस्थापक निरुपाल केदार यांच्याविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी ही माहिती दिली. या लग्नात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले होते, असं सांगण्यात येत आहे.

रविवारी भाजपच्या माजी खासदाराच्या मुलाचे लग्न झाले होते. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनासंदर्भात राज्यातील जनतेला संबोधित करीत होते. मास्क लावण्यासाठी कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या पण या लग्नात नेते नियम तोडताना दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा