वय लपवून बारचा परवाना घेतल्याचा आरोप, समीर वानखेडेविरुद्ध एफआयआर

मुंबई, 21 फेब्रुवारी 2022: प्रसिद्ध आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता वय लपवून बारचा परवाना घेतल्याप्रकरणी समीर वानखेडेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडे यांच्यावर खोटे बोलणे, फसवणूक करणे, शपथेवर खोटी माहिती देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार असून, त्यासाठी त्यांना लहान वयात परवाना मिळाल्याचा आरोप केला होता. नवी मुंबईतील हॉटेल सदगुरु येथे बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे हे 17 वर्षांचे होते, असा दावा मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडे यांना वयाच्या 17 व्या वर्षी मिळाला परवाना

27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांना बार आणि रेस्टॉरंटसाठी परवाना देण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यावेळी समीर वानखेडे हे अवघे 17 वर्षांचे होते. तर बार परवाना मिळविण्यासाठी किमान वय 21 वर्षे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला समीर वानखेडे यांच्या बार आणि रेस्टॉरंटचा मद्यविक्रीचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला होता. वाशी, नवी मुंबई परिसरातील सद्गुरु फॅमिली बार आणि रेस्टॉरंट हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाचे आहे.

समीर वानखेडे वादात

यापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. क्रूझ खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने हे आरोप केले आहेत. किरण गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने दावा केला होता की शाहरुख खानच्या मुलाला सोडण्यासाठी 25 कोटींच्या डीलची चर्चा होत होती आणि शेवटी 18 कोटींमध्ये डील फायनल झाली, त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेला मिळणार होते.

यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेविरोधात एक एक असे खुलासे केले की समीर वानखेडे अडचणीत आले. आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतूनही त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर यांना एनसीबीमध्ये नोकरी मिळाल्याचं नवाब यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक यांनी समीर यांनी दोनदा लग्न केल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा