नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील फुलेनगर येथे चाऱ्याच्या वळईला आग लागून पाच ट्रॅाली चारा भस्मसात

नांदगाव, नाशिक ४ नोव्हेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगांव तालुक्याला भीषण दुष्काळाचे चटके सोसावे लागत असताना, तालुक्यात चारा टंचाई देखील निर्माण झाली आहे. शासन दरबारी चारा मागणी करत असतांना तालुक्यातील पशु पालक चाऱ्याच्या शोधात आहेत. त्यातच नांदगाव मनमाड रोडवरील फुलेनगर येथील शिवाजी विष्णु जगधने व नंदु जगधने याच्या शेतातील, जनावरांसाठी साठवून ठेवलेला पाच ट्रॅक्टर चारा जळुन खाक झाला.

चारा जळाल्याने आता पाळलेल्या गायी, बैलांना चारा उरलाच नाही. चारा तर जळाला पण आता चारा शोधण्याचे संकट या शेतकऱ्याकडे उभे ठाकले आहे. या दरम्यान नांदगांव शहरातील मिनी अग्नीशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. या आगीत सुमारे १५ हजार रुपयांचा चारा जळाला असुन आगीत करपलेला चारा जनावरे खात नाहीत. जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगी संदर्भात महसूल विभागाला कळविण्यात आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा