पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग

यवत, २ सप्टेंबर २०२३ : दौंड तालुक्यातील सहजपूर गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर, सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला सहजपूर फाटा भागात शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास, तीन जड वाहतूक वाहनांना अचानक आग लागल्याने महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली. या घटनेमुळे पुणे सोलापूर महामार्गावर आगीचे तांडव पाहायला मिळत असून घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून महामार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप समजले नसून सदयस्थितीत वाहतूक सुरळीत करण्याचे काम यवत पोलिसांकडून सुरू आहे. केमिकल युक्त टँकर ने उभ्या असणाऱ्या ट्रेलरला धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलय. या अग्निकांडामुळे पुणे सोलापूर हायवे वरती पुण्याला जाणाऱ्या वाहनांची किमान पाच किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा