गोल पोस्ट राष्ट्रीय मालदीवमध्ये अग्नितांडव; ९ भारतीयांचा होरपळून मृत्यु तर एक बांगलादेशी नागरिकाचाही मृत्यु

मालदीवमध्ये अग्नितांडव; ९ भारतीयांचा होरपळून मृत्यु तर एक बांगलादेशी नागरिकाचाही मृत्यु

मालदीव, १० नोव्हेंबर २०२२: मालदीपवची राजधानी माले येथे आज भीषण आग लागली. या दुर्घटनेत नऊ भारतीयांसह दहा जणांचा होरपळून मृत्यु झालाय. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे‌.

ही आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न सूरु होते. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ही आग विझवण्यासाठी तब्बल चार तास लागले. मालेमधील भारतीय उच्चायुत्कांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये आज विदेशी कामगारांच्या घरांना आग लागली.

https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/video_2022-11-10_19-21-25_2XEYPHEfH.mp4?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1668088413627

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर दहा मृतदेह आढळले आहेत. तळमजल्यावरील गॅरेजमध्ये ही आग लागली होती. भारतीय उच्चायुत्कांनी म्हटलं आहे की, मालेमध्ये लागलेल्या आगीत भारतीय नागरिकांसह अनेक लोकांचा मृत्यु झालाय.

भारतीय उच्चायुत्कांनी मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, भारतीयाच्या मदतीसाठी उच्चायुत्कांनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version