गोल पोस्ट पुणे जिल्हा पुण्यात प्रथमच नॅशनल वेस्ट झोन व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धा; १९-२० फेब्रुवारीला रंगणार सामने

पुण्यात प्रथमच नॅशनल वेस्ट झोन व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धा; १९-२० फेब्रुवारीला रंगणार सामने

पुणे १७ फेब्रुवारी २०२६ : क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद ठरणारी नॅशनल वेस्ट झोन व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धा यंदा प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. येत्या १९ व २० फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडणार असून महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई या संघांमध्ये रंगतदार सामने होणार आहेत.स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व कर्णधार ओंकार रौंदाळे करणार आहेत.

संपूर्ण देशभर फेब्रुवारी महिन्यात व्हिलचेअर क्रिकेटचे झोनल सामने सुरू असून, त्यातील महत्त्वपूर्ण सामने पुण्यात होत असल्याने शहराच्या क्रीडाविश्वात उत्साहाचे वातावरण आहे.ही स्पर्धा व्हिलचेअर क्रिकेट इंडिया आणि महाराष्ट्र संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिकेटपटू आहेत.व्हिलचेअरवर क्रिकेट खेळताना खेळाडू दाखवणारी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास प्रेक्षकांना प्रेरणा देणारा ठरत आहे. ‘इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही’ हा संदेश या स्पर्धेतून अधोरेखित होत आहे. व्हिलचेअर क्रिकेट हा केवळ खेळ नसून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.दिव्यांग व्यक्तीदेखील स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये मोठ्या पातळीवर चमकू शकतात, हे या स्पर्धेतून दिसून येणार आहे. त्यामुळे सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : पूजा मालूसरे

error: Content is protected !!
Exit mobile version