कतरिना कैफ, विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’चे पहिले पोस्टर रिलीज

मुंबई, २४ डिसेंबर २०२२ :बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती हे दोघे पहिल्यांदाच ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत नुकतीच एक नवीन अपडेट समोर आली आहे. २०२२ च्या ख्रिसमसच्या एक दिवस अगोदर, ‘मेरी ख्रिसमस’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या अधिकृत पोस्टरचे अनावरण केले.

या पोस्टरमध्ये दोन हात दिसत असून त्या दोन्ही हातामध्ये ग्लास दिसत आहे. या पोस्टरमध्ये असलेल्या ग्लासच्या काचा तुटलेल्या दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिनेकतरिना कैफ हिने त्याला कॅप्शन दिले आहे की, हा चित्रपट तमिळ आणि हिंदी भाषांत २०२३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफने ही माहिती शेअर करताच, चाहते या चित्रपटासाठी अधिक उत्सुक झाले आहे.

दरम्यान, ‘मेरी ख्रिसमस’ व्यतिरिक्त, विजय सेतुपती हा लवकरच वेत्रीमारनच्या ‘विदुथलाई’, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात आणि शाहिद कपूरसोबत प्राइम व्हिडिओ मालिका ‘फर्जी’ मध्ये देखील दिसणार आहे. तर दुसरीकडे, कतरिना ‘टायगर ३’ मध्ये सलमान खान सोबत दिसणार आहे, जो २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा