पहिली महिला राष्ट्रपती “प्रतिभा पाटील”

पुणे, १९ डिसेंबर २०२०: भारतीय राजकारण अनेक वेळा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले आहे आणि अशीच एक घटना घडली होती.२५ जुलै २००७ साली. प्रजासत्ताक भारताच्या त्या १२ व्या राष्ट्रपती झाल्या त्यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर हा पदभार स्वीकारला आणि महिला राष्ट्रपती म्हणून त्या भारतीय इतिहासातील पहील्या महिला आहेत.

व्यक्तिगत व कौटुंबिक …..

प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए. ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी. ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या. १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रतिभा पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.

प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या, अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने नित्कृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती ही त्यांची खूप जमेची बाजू आहे. तसेच याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्यानंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधत आहे.

राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६ व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खात्यांच्या मंत्री होत्या.

राजनैतिक जीवन…….

१.) १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभा पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर(तेव्हाचे एदलाबाद) चे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले. नंतर पाटील या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या. प्रतिभा पाटील राजस्थानच्या गव्हर्नर सुद्धा राहिल्या

२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपती पदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.

२.) प्रतिभाताई पाटील या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखोई सारखे लढाऊ विमान चालवले, ते पण वयाच्या ७४ व्या वर्षी. जगातील एकमेव महिला राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती जपत कुठल्याही प्रकारे राजशिष्टाचार तोडला नाही, एवढ्या त्या आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा आदर करत होत्या व करतात.

३.) इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९ मध्ये त्या मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.

नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बॅंकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.

• राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे……

१९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार

१९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री

१९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री

१९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री

१९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री

१९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या

१९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री

१९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री

१९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड

१९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्ष

१८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हंेबर १९८८ : राज्यसभेच्या उपसभापती

१९९१ : लोकसभेच्या खासदार

८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा