कन्नड, छत्रपती संभाजीनगर, २० जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील भूमिपुत्र तुकाराम वानखेडे आणि त्यांची पत्नी या मस्त्य व्यावसायिक दांपत्यांची दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास कर्तव्यपथावरती प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे. तुकाराम वानखेडे हे मत्स्य शेती व्यावसायिक नेवपुर मध्मप्रकल्पात काम करतात. त्यांनी आतापर्यंत हजारो मुलांना मत्स्य व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच मत्स्य व्यवसायाचा प्रसार करून जनजागृती करण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून ते करत आहे. त्यांच्या या कामाची दखल मत्स्य विभागाने घेतली आणि त्यांच्या निवडीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. त्यांची प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली असल्याचे उपायुक्त ना. वि. भादुले ( प्रादेशिक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय छत्रपती संभाजी नगर) यांनी पत्राद्वारे कळविले