कर्जत, ८ सप्टेंबर २०२०: प्रथम कोरोना रूग्ण सापडल्याने कोरोना विरोधी पथकाने जलालपूर गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असण्याऱ्या जलालपूरमध्ये काल रोजी प्रथम कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आणि पुढील उपाययोजना करण्यासाठी कर्जतमधील जलालपूर येथे दिनांक ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशी माहिती जलालपूर या गावचे ग्रामसेवक श्याम भोसले आणि गावचे पोलिस पाटील आण्णा सांगळे यांनी न्युज अनकटशी बोलताना दिली.
गावात मेडिकल, दूध विक्री यासह अत्यावश्यक सेवा दिलेल्या वेळेत चालू राहतील, तर किराणा सर्व व्यापार व्यवसाय बंद राहतील असे यावेळी सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन केले असता सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष