जालन्यात युवकाकडून गावठी पिस्तूलासह ५ जिवंत काडतुसे जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना ३ जानेवारी २०२४ : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शहरातील आनंदनगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीये. अनिल गोरखनाथ जाधव (वय ३७, राहुलनगर, रेल्वे पटरीजवळ, जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कारमध्ये हा गावठी पिस्तूल बाळगत होता. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कार सह एक गावठी पिस्तूल पाच जिवंत काडतुसे असा ऐकून दोन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तूल बाळगणारे व्यक्तींची माहिती घेऊन कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांना दिले आहेत. जालना हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती की, अनिल गोरखनाथ जाधव हा स्वतःचे ताब्यात अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगून आहे. यावरून सदर व्यक्तीचा घेतला असता तो आनंद नगर परिसरात गुरुचरण हॉस्पिटल समोर चौकात कारसह मिळुन आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून अग्निशस्त्र (गावठी पिस्टल), पाच जिवंत काडतुस आणि एक कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा